धक्कादायक..! लॉजमध्ये तरुणाची जाळून घेऊन आत्महत्या; अनेक चर्चांना उधाण

0 228
Shocking! BSF officer commits suicide by shooting himself

 

संगमनेर- शहरातील नवघर गल्ली परिसरातील एका लॉजमध्ये (lodge) तरुणाने(Young boy) जाळून घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना काल दुपारी घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत या तरुणाने स्वतःला जाळून घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. सागर रघुनाथ ठाकरे (वय ३१, राहणार ओम नगर, बालवाडी शिवार, धुळे) असे मयत तरुणाचे नाव आहे.

 

 

शहरातील नवघर गल्ली परिसरातील प्रसाद लॉजमधील रूम नंबर २६ मध्ये तो मुक्कामी थांबलेला होता. काल दुपारी या रूममधून अचानक धूर यायला लागला. लॉज मधील कामगारांनी या रूमचा दरवाजा तोडला. या रूममध्ये हा तरुण पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत दिसला. याबाबत अनिल बिल्लाडे यांनी त्वरीत शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी रूमची पाहणी केली. तरुणाच्या खोलीमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्या. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या घटनेची पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केलेली आहे.

 

 

Related Posts
1 of 2,177

समजलेल्या माहितीनुसार हा तरुण गेल्या तीन ते चार दिवसांपासून या लॉजमध्ये मुक्कामी होता. तो ज्या कॉटवर झोपलेला होता त्या कॉटच्या खाली दारूच्या अनेक बाटल्या पडलेल्या होत्या. यामुळे दारूच्या नशेत त्याने स्वतःला पेटवून घेतले असावे असा प्राथमिक अंदाज आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: