DNA मराठी

धक्कादायक ! तरुण व्यावसायिकाची गळफास घेवून आत्महत्या; अनेक चर्चांना उधाण

0 292
Husband commits suicide after being harassed by his wife in the district

 

कोरेगाव – बकरी पालनाचा व्यवसाय करणाऱ्या एका तरुण व्यावसायिकाने ( young businessman) झाडाच्या फांदीला गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना आझादपूर ता. कोरेगाव येथे घडली आहे. महेश शिरतोडे (वय २६) असे या मृत तरुण व्यावसायिकाचे नाव आहे.याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, आझादपूर येथील अनिल शिरतोडे यांच्यासह कुटुंबातील सदस्य व भाऊबंद बकरी पालनाचा व्यवसाय करतात. गावातच सामाजिक वनीकरण विभागाच्या तलावानजीक त्यांनी काल, रविवारी एका शेतकऱ्याच्या शेतात बकरी बसविल्या होत्या. महेश हा रात्रीच्या सुमारास कोणासही काहीही न सांगता निघून गेला होता. आज, सोमवारी सकाळी त्याने झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

 

Related Posts
1 of 2,448

कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळी जाऊन खातरजमा केल्यानंतर अनिल शिरतोडे यांनी कोरेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी आकस्मित मृत्यू अशी पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक कुंभार तपास करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: