धक्कादायक ! चाकूचे 25 वार करून महिलेचा घेतला जीव, गुन्हा दाखल

0 256

नाशिक –   नाशिक (Nashik) मधील गंगापूर (Gangapur) परिसरात एका महिले (Woman) ला चाकूचे  एकापाठोपाठ 25 वार करून हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. पूजा आंबेकर मृताचे नाव आहे. या प्रकरणात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याचा अंदाज असून या प्रकरणात संशयित असलेला  संतोष आंबेकर फरार आहे.  पोलीस त्याचा शोध घेत आहे. तो पूजा सोबत राहत होता.  त्याने पूजा वर एकदोन नव्हे, तर चक्क जवळपास 25 चाकूचे वार केल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र अद्याप तो फरार आहे.

भाचा घरी आला अन् मामाच्या मुलीलाच पळविले, गुन्हा दाखल

Related Posts
1 of 1,608

तर दुसरीकडे 20 रुपयांसाठी मजुराचा गळा चिरून खून केल्याची घटना देखील नाशिकच्या पंचवटीमध्ये घडली होती. या प्रकरणात  संशयित आरोपी पंडित गायकवाड उर्फ लंगड्या याने बिडी पिण्यासाठी फिरस्ता असलेल्या मजुराकडे 20 रुपये मागितले. त्याने पैसे न दिल्याचा राग आल्याने आरोपीने त्याच्या गळ्यावर वार करुन खून केला. मारेकऱ्याने तरुणाचा गळा चिरला. तेव्हा त्याच्या रक्ताचे डाग चक्क अर्ध्या किलोमीटरपर्यंत पडले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतला. तेव्हा त्यात पंपावर एक व्यक्ती हात धुत असल्याचे दिसले. त्या व्यक्तीची चौकशी करून पोलिस आरोपी पर्यंत पोहचले.

हे पण पहा – केंद्र सरकारकडून पेट्रोल – डीझेल ५ रुपयांनी स्वस्त, ठाकरे सरकार देणार का दिवाळीचा गिफ्ट?

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: