धक्कादायक..! महिलेला लोखंडी पाईपने मारहाण; केडगाव उपनगरातील घटना

0 366
Young man beaten to death on suspicion of mobile theft; Death of a young man

 

अहमदनगर – किस्कोळ कारणातून केडगाव उपनगरातील ओंकारनगरमध्ये एका महिलेला लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पती-पत्नीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल मधुकर काळे (वय ४७ रा. ओंकारनगर, केडगाव) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव असून त्यांनी फिर्याद दिली आहे.

 

गुन्हा दाखल झालेल्यामध्ये स्वप्नील साळवे व त्याची पत्नी (नाव माहिती नाही) यांचा समावेश आहे. गुरूवारी सकाळी १० वाजता हा प्रकार घडला. मंगल काळे त्यांच्या घरासमोर पाणी भरत असताना स्वप्नील साळवे याने त्याचे चारचाकी वाहन काळे यांनी पाणी भरण्यासाठी टाकलेल्या पाईपवरून घातले. यावरून काळे यांनी त्यांना जाब विचारला असता त्यांना लोखंडीपाईपने मारहाण करण्यात आली.

 

Related Posts
1 of 2,190

खोटा अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: