धक्कादायक विधवा महिलेवर अत्याचार, तोफखण्यात गुन्हा दाखल

0 320
अहमदनगर-  विधवा महिलेवर (Widowed women) अत्याचार केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तरुणाविरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारणात पिडीत महिलेने दिलेल्या फि्यादीवरुन साजिद अब्दुल लतीफ शेख ऊर्फ लाला (रा. बोल्हेगाव) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या पतीचे निधन झाल्यामुळे ती मुलांसह नगर शहरातील एका उपनगरात तिच्या माहेरी राहत होती. फिर्यादी यांची साजिद सोबत ओळख होती. फिर्यादीच्या पतीचे निधन झाल्याचा गैरफायदा घेत साजिद तिच्याकडे लग्न करण्याची मागणी धरली. यासाठी तो फिर्यादी, तिची मुले, आई व भावाला जीवे   मारण्याची धमकी देत होता. साजिद याने फिर्यादीला मे २०२१ मध्ये त्याच्या घरी नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पोलिसांनी साजिद विरोधा भादंवि ३७६, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

माहेरी आलेल्या विवाहितेचा विनयभंग
तर दुसरीकडे शहरातील उपनगरमध्ये माहेरी आलेल्या विवाहितेसोबत घरात घुसून गैरवर्तन करणाऱ्या तरुणाविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  बाळासाहेब नामदेव वाबळे (रा. केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे.
पीडित महिला दिवाळीनिमित तिच्या माहेरी आली होती. २५ नोव्हेंबर रोजी पीड़ित महिला घरी असताना बाळासाहेब वाबळे तिथे आला. त्याने पीडितेला जवळ ओढत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावेळी पीडिता त्याला विरोध करत असताना तिच्या गळ्यातील गंठण तुटून गहाळ झाले आहे. याच दरम्यान, पीडितेचा पती त्याठिकाणी आला असता वाबळेने त्यालाही शिवीगाळ करत तुम्ही कुठे जाताय, असे म्हणत तलवारीने कापण्याची धमकी दिली. अधिक तपास कोतवाली पोलीस करत आहेत.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: