धक्कादायक !’चायनीज’साठी मृतआणि कुजलेल्या कोंबडय़ांचा वापर , गुन्हा दाखल

0 295
 नवी मुंबई –   मुंबई (Mumbai) मधील काही ठिकाणी चायनीज स्टॉल (Chinese stalls) आणि उपाहारगृहां (Restaurants) मध्ये चायनीज बवण्यासाठी मृत, कुजलेल्या कोंबडय़ांचा वापर होत असल्याचा समोर आल्यानंतर या  प्रकरणात आता अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) ने मेलेल्या आणि कुजलेल्या कोंबडय़ांची बेकायदा विक्री करणाऱ्यांविरोधातील कारवाई तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर एका अज्ञात व्यक्तीविरोधात एफडीएने जे. जे. पोलीस ठाण्यात गुन्ह्णा देखील दाखल केला आहे. (Shocking! Use of dead and rotten hens for ‘Chinese’, crime filed)
अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार खाण्यासाठी जिवंत कोंबडय़ांचाच वापर करणे बंधनकारक आहे. मुंबईत नाशिक, पुणे आणि इतर जिल्ह्यांतून कोंबडय़ा आणल्या जातात. मुंबईत पोहोचण्यापूर्वी प्रवासात काही कोंबडय़ांचा मृत्यू होतो. मृत कोंबडय़ांची महापालिकेच्या मदतीने योग्य विल्हेवाट लावणे विक्रेत्यांना बंधनकारक आहे. पण प्रत्यक्षात मुंबईतील कोंबडी विक्रेत्यांकडून या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. एफडीएने यापूर्वी अनेकवेळा कोंबडी विक्रेते आणि मेलेल्या, कुजलेल्या कोंबडय़ांची बेकायदा विक्री करणाऱ्याविरोधात कारवाई केली आहे. पण तरीही ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरूच आहे. नळबाजार येथे अशा प्रकारे मेलेल्या, कुजलेल्या कोंबडय़ांची बेकायदा विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एफडीएने जे. जे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती बृहन्मुंबई (अन्न), एफडीएचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली.
Related Posts
1 of 1,487

मेलेल्या, कुजलेल्या कोंबडय़ांची योग्य विल्हेवाट न लावता विक्रेते त्या दुकानाबाहेर फेकून देतात. काही नागरिक फेकलेल्या कोंबडय़ा जमा करून गोणीत भरून आसपासच्या चायनीज स्टॉलधारकांना, छोटय़ा उपाहारगृहांना स्वस्तात विकतात, असे केकरे यांनी सांगितले. अशा कोंबडय़ांचे सेवन करणे मानवी आरोग्यास घातक असते. या कोंबडय़ांच्या सेवनामुळे कर्करोगासारखा जीवघेणा आजार होत असल्याचे अनेक संशोधनातून उघडकीस आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या सर्व बाबी लक्षात घेता तसेच नळबाजारमधील अशा प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईतील कोंबडी विक्रेत्यांविरोधात कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या कारवाईत दोषींविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचेही केकरे यांनी सांगितले. (Shocking! Use of dead and rotten hens for ‘Chinese’, crime filed)

हे पण पहा –  ‘नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय’ | विखे म्हणतात, ‘रुको जरा सबर करो!’

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: