धक्कादायक! चार वर्षीय मुलावर १२ वर्षीय मुलाचा अनैसर्गिक अत्याचार

0 528

पुणे –   पिंपरी चिंचवड शहरात  एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलाने चार वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटने बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार १२ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलाने चार वर्षीय अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करत अत्याचार केल्याचं उघड झाले आहे. हा सर्व प्रकार मुलं राहात असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये घडला आहे. चार वर्षीय मुलाने घडलेला प्रकार त्याच्या बहिणीला सांगितला. बहिणीने पीडित मुलाच्या आईला याची माहिती दिली.
Related Posts
1 of 1,603

दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पीडित मुलाच्या आईने पतीला याची माहिती दिली. त्यानंतर, सांगवी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. कोरोनामुळे अनेक शैक्षणिक संस्था बंद असल्याचे ऑनलाइन क्लास असल्याने अवघ्या तीन वर्षांच्या मुलांकडेही मोबाईल पाहायला मिळत आहे. यामुळे मुलं नेमकी काय पाहतात, कुठे जातात, कोणाशी मैत्री करतात हे पाहणं आणि याची माहिती ठेवणं पालकांच कर्तव्य आहे असं मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक टोपणे यांनी व्यक्त केलं आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक येडे हे करत आहेत.

हे पण पहा –  Pimpri Chinchwad | दुकान मालकावर कोयत्याने सपासप वार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: