धक्कादायक! राज्यात धावत्या रेल्वेत तरुणीवर अत्याचार, दोन संशयित आरोपींना अटक

0 341

कल्याण –    मागच्या काही महिन्यापासून राज्यात महिला विरुद्ध होणाऱ्या गुन्हेत वाढ पहिला मिळत आहे.   मागच्या काही दिवसांपूर्वीच राज्याची राजधानी मुंबई मधील साकीनाका परिसरत एका ३० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार (Gang rape) केल्याची घटना घडली होती. यानंतर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करण्यात आला होता.

पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या कारवाई मुळे आता तरी राज्यात महिला विरोधात होणाऱ्या गुन्हा थांबतील अशी आशा व्यक्त होत होती मात्र राज्यात पुन्हा एकदा बलात्काराची घटना घडली आहे. इगतपुरी-कसारा (Igatpuri-Kasara)  स्थानकांदरम्यान धावत्या रेल्वेत (Running Train) एका २० वर्षीय तरूणीवर अचानक रेल्वेत शिरलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी धावत्या ट्रेनमध्यच बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

नराधमांनी रेल्वेतील 15 ते 20 प्रवाशांना लुटल्यानंतर (Robbery in train) त्यांनी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला आहे. संबंधित धक्कादायक घटना लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये (lucknow – mumbai pushpak express) घडली असून याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक (2 accused arrested) केली आहे.   

Related Posts
1 of 1,487

मिळलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांनी अचानक लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रवेश केला. यावेळी दरोडेखोरांनी 15 ते 20 प्रवाशांना लुटलं. आरोपींनी प्रवाशांकडून रोख रक्कमेसह किमती मुद्देमाल हिसकावून घेतला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण पसरलं होतं. प्रवाशांना लुटल्यानंतर दरोडेखोरांची नजर रेल्वेतून प्रवास करणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर पडली.

यानंतर नराधमांनी 20 वर्षीय तरुणी सोबत जबरदस्ती करत धावत्या ट्रेनमध्येच तिच्यावर बलात्कार केला. या संतापजन घटनेनंतर नराधमांनी घटनास्थळावरून पळ काढला. संबंधित संतापजनक प्रकार इगतपुरी ते कसारा रेल्वे स्थानकांदरम्यान घडला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कल्याण जीआरपीने दरोडा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

‘एका रात्रीसाठी खेळाडूनं ऑफर केली मोठी रक्कम’,प्रसिद्ध मॉडेलचा गौप्यस्फोट

दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. तसेच अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर, रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

 हे पण पहा – दिल्लीच्या तख़्तासमोर महाराष्ट्र कधीही झुकलेला नाही आणि झुकणार नाही

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: