धक्कादायक ! दुमजली घराला भीषण आग, 7 जणांचा जागीच मृत्यू ; गुन्हा दाखल

0 229
Shocking! Two-storey house on fire, 7 killed on the spot; Filed a crime

 

इंदूर :  मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) व्यापारी शहर असलेल्या इंदूरच्या (Indore) स्वर्ण बाग कॉलनीत लागलेल्या भीषण आगीत (A fierce fire) सात जणांचा जाळून मृत्यू (7 killed) झाला.  कॉलनीतील एका दुमजली घराला आग लागल्यानंतर मदत आणि बचाव पथकाने तेथून 9 जणांची सुटका केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ज्या घरात आग लागली ते अन्सार पटेल यांचे घर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त हरिनारायण चारी मिश्रा यांच्यासह अनेक अधिकारी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी हजर झाले. ही घटना आज शनिवारी पहाटे 4 ते 5 वाजेच्या दरम्यानची आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. (Shocking! Two-storey house on fire, 7 killed on the spot; Filed a crime)

विजय नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी तहजीब काझी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीमुळे प्रभावित निवासी इमारतीतून पाच जणांना मृत अवस्थेत बाहेर काढण्यात आले, तर इतर 11 जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात पाठवण्यात आले. इलेक्ट्रिक मीटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली आणि आधी इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आग लागली, असे त्यांनी सांगितले.काझीच्या म्हणण्यानुसार, आगीत मृत्युमुखी पडलेल्या पैकी बहुतांश लोकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. आग आटोक्यात आणण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Related Posts
1 of 2,427

इमारतीचा मालक अन्सार पटेल याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, प्रत्येक मजल्यावर फ्लॅट असलेल्या इमारतीमध्ये अग्निसुरक्षा उपकरणे बसवण्यात आली नसल्यामुळे त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 304 अ अन्वये निष्काळजीपणाने मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अन्सारने फ्लॅट भाड्याने दिला होता. (Shocking! Two-storey house on fire, 7 killed on the spot; Filed a crime)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: