धक्कादायक…! भाजपच्या ‘या’ माजी आमदाराच्या दोन भावांची गोळ्या झाडून हत्या

0 417

 

दिल्ली – बिहारमधील (Bihar) निर्भय गुन्हेगारांचा नंगा नाच थांबताना दिसत नाही. आता राजधानी पाटणा (Patna) येथून ताजी घटना समोर आली आहे, जिथे गुन्हेगारांनी भाजपच्या माजी आमदाराच्या (BJP Ex MLA) दोन भावांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. ही घटना काल संध्याकाळची आहे, मृतांची ओळख अरवल येथील भाजपचे माजी आमदार चित्तरंजन शर्मा (Chittaranjan Sharma) यांचे चुलत भाऊ आहेत. एका भावाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या भावाचा आज सकाळी पाटण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटनेच्या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पाटणातील पत्रकार नगर भागात मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात हल्लेखोरांनी दोन चुलत भावांवर अंदाधुंद गोळीबार केला. पाटणा एसपी मानवजीत सिंह ढिल्लन यांनी सांगितले की, पीडितांपैकी एकाचे नाव गौतम सिंग, तर दुसऱ्याचे नाव शंभू सिंग असे आहे. गौतमचा जागीच मृत्यू झाला, तर शंभूचा आज सकाळी रुग्णालयात मृत्यू झाला.

 

 

Related Posts
1 of 2,222

पाटणाचे एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लन यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की हे दोन गटांमधील वैमनस्यचे प्रकरण असू शकते. ही घटना पाटणातील धनरुआ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नीमा गावातील आहेत. या गावात दोन टोळ्या असून यापूर्वी अनेक खुनात त्यांचा सहभाग होता. आजची घटना त्याचाच परिपाक असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन महिन्यांपूर्वी भाजप आमदार चित्तरंजन शर्मा यांच्या काका आणि चुलत भावाची हत्या करण्यात आली होती. म्हणजे दोन महिन्यात भाजप आमदाराच्या कुटुंबातील चार जणांची हत्या झाली.

 

 

पांडव टोळीचे नाव समोर, तपास सुरू
एएसपीच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी हल्ल्यासाठी बेकायदेशीर 7.6 आणि 9 एमएम पिस्तुलचा वापर केल्याचे तपासात उघड झाले आहे. हल्लेखोरांना ओळखण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेत पांडव टोळीचे नाव समोर आले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: