धक्कादायक! सैतानाचा अवतार असल्याचे सांगत महिलेला नग्न करून बळी देण्याचा प्रयत्न

0 259

बारामती –  बारामती (Baramati)  जिल्ह्यातील  करंजेपुल (Karajipul) तालुक्यामध्ये एका महिले (woman) ला सैतानाचा अवतार असल्याचे समजून त्यावर उपाय करण्यासाठी  मांत्रिकाच्या सल्ल्याने तिला नग्न करत अघोरी कृत्य करत तिचा बळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे .(Shocking! Trying to sacrifice the woman naked by saying that Satan is an incarnation)

हि घटना समोर येताच महिलेच्या सासरच्या चौघांसह मांत्रिक अशा पाचजणांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यासह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेंद्र माणिकराव गायकवाड, राजेंद्र माणिकराव गायकवाड, कौशल्या माणिकराव गायकवाड (सर्व रा. करंजेपूल, ता. बारामती), नणंद निता अनिल जाधव (रा. चाकण, ता. खेड) व तात्या नावाचा मांत्रिक (नाव, पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करंजेपूलला राहणाऱ्या महिलेने याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . महेंद्र व राजेंद्र हे महिलेचे दीर असून कौशल्या या सासू आहेत. फिर्यादीचा विवाह झाल्यापासून सासू व दीराकडून लग्नात हुंडा जादा दिला नाही या कारणावरून तिचा छळ केला जात होता. वारंवार मारहाण व जाचहाट केला जात होता.

रेल्वेमध्ये चढताना महिलेचा पाय घसरला,पहा हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Related Posts
1 of 1,481

नणंद माहेरी आल्यानंतर तिनेही त्यांना भरीस घातले. दोन्ही दीर व सासूने तिला भूतबाधा झाली असल्याचे पसरवत तात्या नामक मांत्रिकाला घरी बोलावले. त्याने सांगितल्यानुसार आरोपींकडून लिंबू उतरणे, अंगारे-धुपारे टाकणे, भस्म लावणे, अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडणे, उपाशी ठेवणे असे प्रकार केले गेले. या प्रकरणात बारामती शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Shocking! Trying to sacrifice the woman naked by saying that Satan is an incarnation)

हे पण पहा –  ‘नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय’ | विखे म्हणतात, ‘रुको जरा सबर करो!’

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: