DNA मराठी

धक्कादायक! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप; अनेक चर्चांना उधाण

0 327
Annoying! Doctor tortures minor girl; Filed a crime
  मुंबई –  मनोरंजन सृष्टीत एकच खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्यावर (famous actor) बलात्काराचा (Rape) आरोप लावण्यात आला आहे. चित्रपटांमध्ये काम देण्याच्या आमिषाने महिलेसोबत शारीरिक संबंध बनवल्याचा आरोप या प्रसिद्ध अभिनेत्यावर लावण्यात आल्याने मनोरंजन सृष्टीत अनेक चर्चांना उधाण आले आहे.

मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील लोकप्रिय चेहरा असणारे अभिनेता विजय बाबू (Vijay Babu) याच्यावर हा आरोप लावण्यात आला आहे. अभिनेत्यासोबतच तो एक निर्माता आणि उद्योजकसुद्धा आहे. कोडीझोड भागात राहणाऱ्या पीडित महिलेने विजय बाबूविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या महिलेने तक्रार करत म्हटलं आहे, चित्रपटांमध्ये काम देण्याच्या आमिषाने आपलं शारीरिक शोषण करण्यात आल्याची तक्रार पीडितेने दिली आहे.

Related Posts
1 of 2,524

या पिडीत महिलेने आपल्या तक्रारीमध्ये सांगितलं आहे कि , ‘एर्नाकुल भागात असलेल्या आपल्या फ्लॅटवर या अभिनेत्याने कामाचं आमिष दाखवून आपल्या सोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले आहेत. दरम्यान २२ एप्रिल रोजी या अभिनेत्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु अद्यापही पोलिसांनी या प्रकरणात अभिनेत्याची चौकशी केलेली नाहीय. विजय बाबूविरुद्ध बलात्कार आणि गंभीर प्रकारे शारीरिक इजा पोहोचवल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे.

या अभिनेत्याचं ‘फ्राईडे फिल्म’ नावाचं प्रोडक्शन हाऊस आहे. विजय बाबूने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोबतच अनेक चित्रपटांची निर्मितीदेखील केली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: