धक्कादायक ! शिक्षकानेच केला अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड – मागच्या काही दिवसांपासून पुणे शहरासह पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) बाललैंगिक अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर (law and order) मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. पेशाने शिक्षक (Teacher) असलेल्या एका तरुणाने आपल्याच नात्यातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला (Minor Girl) फटके देण्याची धमकी देत शारीरिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी ही पीडितेच्या आते भाऊ आहे. तो पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या नराधमाने आपल्याच नात्यातील मुलीसोबत हे कृत्य केले आहे. आरोपी हा खासगी शिकवणी वर्ग घेतो. पीडित मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून तिला घरात बोलावले. त्यानंतर 25 फटके मारीन अशी धमकी देऊन अश्लिल कृत्य केले. या घटनेमुळे पीडिता भयभीत झाली. त्यानंतर तिने हा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी चाकण पोलिसांनी संबंधित शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मागील 20 दिवसांत 11 अत्याचाराच्या घटना
धक्कादायक म्हणजे, मागील वीस दिवसातील बाल लैंगिक अत्याचाराची ही घटना असल्याने घरी राहणाऱ्या आणि एकल राहणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वेगवेगळ्या 11 घटनांमध्ये तीन घटनात वडिलांनीच आपल्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तर इतर घटकांमध्ये ओळखीच्या व्यक्तीने शेजाऱ्याने, सोशल मीडियावर ओळख करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये घडल्या आहेत.