धक्कादायक! शिक्षकानेच केला शिक्षिकेचा विनयभंग; गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित शिक्षिकेकडे १२ वीचे पेपर तपासण्यासाठी होते. त्यावेळी त्यांना काही अडचणी आल्यास, त्या आरोपी विकास पवार यांना फोन करीत असत, त्यातून त्यांची चांगली मैत्री झाली. त्याच दरम्यान आता शेवटचा पेपर तपासून झाला असल्याने, काल सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपी विकास पवार पीडित महिलेला म्हणाला की,आपण लस्सी पिण्यास जाऊ,त्यावर त्यांनी होकार दिला.