धक्कादायक ! अजाण सुरू असताना उपनिरीक्षकानेच लावले गाणे; गुन्हा दाखल

0 257
"If you don't talk to me ..." Filed at Tof Khana Police Station

सातारा – एकिकडे राज्यात मागच्या काही दिवसांपासून आजणवरून चांगलाच राजकारण सूरु आहे. तर दुसरीकडे या प्रकरणावरून समाजामध्ये धार्मिक भावना भडकवणाऱ्या काही जणांना विरुध्द गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पुन्हा एकदा या प्रकरणावरून सातारा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस उपनिरीक्षका विरुध्दच (sub-inspector) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर गडप्पा मलकूनाईक अस गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

अजाण सुरू असताना एका पोलीस उपनिरीक्षकाने मोठ्या आवाजात गाणे लावल्या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे कृत्य करणारा रेल्वे पोलिसात उपनिरीक्षक आहे.

उपनिरीक्षक मलकूनाईक सातारा परिसरातील अमृतसाई इमारतीत राहतात. त्यांनी शनिवारी सायंकाळी राहत्या घराच्या मागे असणाऱ्या मशीदच्या दिशेने नमाज पठन करण्याच्या वेळी लाऊड स्पिकरवर ठेवून मोठ्या आवाजात गाणे लावले. त्या भागातील नागरिकांनी याबाबत नियंत्रण कक्षात तक्रार दिली. त्यावरून पोउपनि सोनवणे यांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि कराळे करत आहेत.

Related Posts
1 of 2,420

रेल्वे सुरक्षा बलमध्ये पोलीस उपनिरीक्षकच्या जबाबदार पदावर असताना सुद्धा त्यांनी घराच्या मागे असलेल्या मशीदच्या दिशेने नमाज पठन सुरु असताना मोठ्या आवाजात लाऊड स्पीकरवर गाणे लावले. यातून 2 धर्मात तेढ निर्माण होऊ शकते आणि वेगवेगळ्या गटात शत्रुत्व वाढू शकते , त्यामुळ ही क्रिया चिथावणीखोर असल्याचं पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांचे आदेश क्र.जा क्र विशा-4/आदेश/औ बाद/ 2022-1575 औरंगाबाद दि. 22/04/2022 अन्वये प्राप्त आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 37(1) व (3) चे उल्लंघन केले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: