समोर आलेल्या माहितीनुसार मयत डिगांबर हरिभाऊ गाडेकर हे माजलगावच्या संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका समितीचे सदस्य होते. त्यांच्या पत्नीच्या प्रेमात त्यांचाच भाचा पडला होता. प्रेमाचा मार्ग मोकळा करण्यासाठी त्याने दोन जणांची मद्दत घेत मामाची सिनेस्टाईल हत्या केली. सुरुवातीला त्याने रिधोरी येथे बंधाऱ्याजवळ मामाच्या शरीराचे दोन तुकडे केले. यानंतर ते तुकडे एका पोत्यात भरले आणि विहिरीत फेकले.
मृत डिगांबर हे 30 सप्टेंबर 2021 रोजी घरातून बेपत्ता झाले होते. तर तेच दुसरीकडे 11 मे 2022 यादिवशी वारोळा शिवारातील एका विहिरीत मृतदेहाचा कमरेखालील भाग आढळला. तर तीन दिवसांनी विहिरीच्या तळाला शिर आणि धड असलेला शरीराचा भागही आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. तर या मृतदेहाची तपासणी केली असता पँटच्या खिशात काही महिलांचे पासपोर्ट फोटो आढळले. डिगांबर हरिभाऊ गाडेकर हे माजलगावच्या संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका समितीचे सदस्य होते. या माध्यमातून ते महिलांना निराधार योजनेचा लाभ मिळवून देत. म्हणून हा मृतदेह त्यांचा असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
या आधारावर पोलिसांनी संबंधित महिलांची ओळख पटवली. तसेच त्यांची विचारपूसही केली. यानंतर त्या महिलांनी नऊ महिन्यांपूर्वी डिगांबर यांना निराधार योजनेच्या लाभासाठी फोटो दिल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर ओळख म्हणून डिगांबर यांच्या डोक्याला छिद्र होते, याबाबतची माहिती त्यांचे बंधू नारायण यांनी दिली. या माहितीच्या आधारे हा मृतदेह डिगांबर असल्याचे स्पष्ट झाले. ही धक्कादायक घटना तब्बल नऊ महिन्यांनी समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी भाचा, पुतण्यासह, अन्य एकाला अटक केली आहे.