धक्कादायक! ‘त्या’ घरफोडीचा मास्टरमाईंड फिर्यादीचा मेहणाच; आरोपीला अटक

0 184
The thief stole Rs 20 lakh from the house and wrote on the TV screen I LOVE YOU

 

अहमदनगर – केडगाव परिसरात दिवसा घरफोडी करून तीन लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने (Gold – Silver jewellery) चोरून नेल्याची घटना घडली होती.

 

फिर्यादीच्या मेहुण्याने आरोपींना घरफोडीबाबत माहिती पुरवल्याचे तपासात समोर आले आहे. मंगळवारी अविनाश दिलीप क्षेत्रे (रा. भूषणनगर, केडगाव) याला अटक केल्यानंतर तपासादरम्यान कोतवाली पोलिसांना ही माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी अमोल बाबासाहेब जरे (रा. केडगाव) याला गुन्ह्यात अटक केली आहे.

 

Related Posts
1 of 2,326

याप्रकरणी पुजा मनोज बडे यांनी फिर्याद दिली होती. कोतवाली पोलिसांनी तपास करून सुरूवातीला आरोपी क्षेत्रे याला अटक केली. त्याच्याकडून सहा तोळे सोने आणि ९२० ग्रॅम वजनाची चांदी असा दोन लाख ४२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस आरोपी क्षेत्रेकडे गुन्ह्यासंदर्भात अधिक चौकशी करत असताना फिर्यादीचा मेहुणा असलेल्या अमोल जरे याने चोरट्यांना माहिती पुरवल्याचे तपासात समोर आले आहे. यानंतर कोतवाली पोलिसांनी जरे याला ताब्यात घेत अटक केली आहे.

 

फिर्यादी कुटुंबासह देव दर्शनासाठी जेजुरी याठिकाणी गेल्या असताना आरोपी जरे देखील त्यांच्यासोबत होता. जेजुरीला पोहोचल्यानंतर जरेने आरोपी क्षेत्रे याला फोन करून आम्ही जेजुरीला पोहोचलो आहोत, असे सांगितले होते, त्यानंतर क्षेत्रेने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने घरफोडी करत तीन लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने चोरले होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: