धक्कादायक ! झोपडीला भीषण आग लागल्याने ; एकाच कुटुंबातील सात जणांचा मुत्यू

0 303
Shocking! The hut caught fire; Seven members of the same family died
प्रतिनिधी- DNA मराठी टीम
लुधियाना – झोपडीला आग (fire)लागल्याने एकाच कुटुंबातील (family) सात जण जिवंत जळल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील (Punjab) लुधियाना (Ludhiana) शहरात घडली आहे.  या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.  (Shocking! The hut caught fire; Seven members of the same family died)
Related Posts
1 of 2,326

समोर आलेल्या माहितीनुसार  बुधवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे.  झोपडीला आग लागल्याने एकाच कुटुंबातील सात जण जिवंत जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. लुधियानाचे सहाय्यक पोलिस आयुक्त (पूर्व) सुरिंदर सिंग यांनी सांगितले की, ते स्थलांतरित मजूर होते आणि येथील टिब्बा रोडवरील पालिकेच्या कचरा डंप यार्ड जवळ त्यांच्या झोपडीत झोपले होते. टिब्बा पोलिस स्टेशनचे एसएचओ रणबीर सिंग यांनी पीडित दाम्पत्य आणि त्यांची पाच मुले अशी ओळख पटवली आहे.

सुरेश सैनी (55), रोशनी देवी (50), राखी कुमारी (15), मनीषा कुमारी (10), चंदा कुमारी (08), गीता कुमारी (06), सनी (02) यांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी अपघातात फक्त राजेश कुमार जिवंत आहे. हे सर्व बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवासी होते. रात्रीचे जेवण करून रात्री आठ वाजता कुटुंब झोपले होते. (Shocking! The hut caught fire; Seven members of the same family died)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: