धक्कादायक ! लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने प्रेयसी प्रेयसीसमोरच स्वतःवर झाडली गोळी

बिंदने घरापासून सुमारे 250 मीटर अंतरावर आपल्या प्रेयसीसमोरच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. रामविलास बिंद सोबत गाडीत कुणी महिला असल्याची माहिती प्रेयसीला मिळाली होती. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. भांडणादरम्यान प्रेयसीने प्रियकराला मदिहान पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याची धमकी दिली. यानंतर ती बाहेर पडली. यावर, तिला समजावण्यासाठी रामविलासही आपली कार घेऊन तिच्या मागे निघाला. घरापासून सुमारे अडीचशे मीटर अंतरावर गेल्यानंतर, तो कारमधून खाली उतरला आणि प्रेयसीसमोर जाऊन तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागला. पण प्रेयसी ऐकायला तयार नव्हती. यानंतर रामविलासने आपल्या जवळील अैध पिस्तुल डोक्याला लावूनही तिला स्वत:वर गोळी झाडण्याची धमकी दिली. मात्र, तरीही ती ऐकायला तयार नव्हती.
यानंतर, अखेर रामविलासने प्रेयसी समोरच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. यानंतर घटनेची माहिती मिळताच ठाणेदार शैलेश राय घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संबंधित पिस्तूल ताब्यात घेतले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच मृतदेहाजवळच रडत असलेल्या प्रेयसीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले.