त्यानंतर तिच्या अपहरणाची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. कुटुंबीयांनी अपहरणाचा आणि हत्येचा आरोप तिच्यासोबत काम करणाऱ्या दोन तरुणांवर लावला आहे. कुटुंबीयांनी सांगितल्याप्रमाणे ही गायिका एका व्हिडीओ सॉंगच्या शूटिंगसाठी रोहित नावाच्या एका तरुणासोबत भिवानी याठिकाणी गेली होती.
दरम्यान महम याठिकाणी ती रोहितसोबत एका हॉटेलमध्ये जेवण करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. महम पोलीस एसआय विकास यांनी माहिती देत सांगितलं की, भैनी भैरो गावाच्या एका ओढ्याजवळ आम्हाला काल एक मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह फारच वाईट अवस्थेत आहे. त्याची ओळख पटणंदेखील कठीण झालं होतं. या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यासाठी आणि त्या तरुणीची ओळख पटण्यासाठी मृतदेह रोहतकच्या शवगृहात ठेवण्यात आलं होतं. दरम्यान हा मृतदेह हरियाणा गायिका संगीताचा असल्याची ओळख पटविण्यात आली आहे.