धक्कादायक ! दोन दिवसांनंतर सापडला बेपत्ता मुलीचा मृतदेह; परिसरात एकच खळबळ

मुंबई – मुंबईतील गोरेगाव परिसरात एका मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी गोरेगाव पोलीस ठाण्यात (Goregaon police station) मुलगी बेपत्ता (missing girl )झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्याच मुलीचा मृतदेह वर्सोवा बीचवर (Versova Beach) आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह कुजलेला असून मुलीचा वायरने गळा आवळून खून करण्यात आल्याचं दिसून येत आहे.
मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर, पोलिसांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मृतदेहाचे फोटो अपलोड केले आणि काही मिनिटांनंतर त्यांना गोरेगाव पोलिसांकडून उत्तर मिळाले की पालकांनी दोन दिवसांपूर्वी ती हरवल्याची तक्रार केली होती. या प्रकरणात, मुलगी बेपत्ता होण्याच्या अॅंगलनं तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुलगी रात्री उशिरापर्यंत तिच्या ट्यूशन क्लासमधून परत आली नव्हती, त्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसांशी संपर्क साधला. ज्यूनियर कॉलेज पास केल्यानंतर मुलगी वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत होती.
गोरेगाव पश्चिम येथील एका चाळीत मृत मुलगी तिच्या आई-वडील आणि भावंडासोबत राहत होती. तिचे वडील टॅक्सी चालक आहेत. अधिकाऱ्यानं सांगितलं की, मंगळवारी मुलगी दुपारी 4 वाजता कोचिंग क्लाससाठी घरातून निघाली होती. मुलीशी शेवटचे बोलल्यानंतर तिचा मोबाईल बंद होता. दुसरीकडे वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर सायंकाळी 5.30 च्या सुमारास मुलीचा मृतदेह पोत्यात तरंगत असल्याचे स्थानिक लोकांनी पाहिले आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.
हत्येपूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार झाले की नाही किंवा तिचा बॉयफ्रेंड होता का, हे तपासण्यासाठी आम्ही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत, असे वर्सोवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. यासाठी आम्ही मुलीचा कॉल रेकॉर्ड डेटाही तपासत आहोत, असंही पोलीस म्हणाले.