धक्कादायक ! स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने तरुणाची आत्महत्या

0 233

धुळे –   महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा ( MPSC ) च्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत अवघ्या एका गुणाने अनुत्तीर्ण झालेल्या वाघाडी खुर्द (ता. शिंदखेडा) येथील २८ वर्षीय तरुणाने औरंगाबाद (Aurangabad) ला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. किशोर भटू जाधव असे मृत तरुणाचे नाव आहे. (Shocking! Suicide of a youth due to failure in competitive examination)

वर्ग एकचा अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगून वाघाड येथील किशोर भटू जाधव हा गेल्या काही वर्षांपासून एमपीएससीचा अभ्यास करीत होता. गेल्या चार वर्षांपासून तो औरंगाबाद येथे अभ्यास करीत होता. यापूर्वी स्पर्धा परीक्षेद्वारे पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. परंतु, उंची कमी पडल्याने, त्याला संधी मिळाली नाही. नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी परीक्षेत अवघ्या एका गुणाने तो अनुत्तीर्ण झाला.

हे पण पहा  – Praniti Shinde | काँग्रेस आमदार प्रणिती शिंदें यांच्यावर गुन्हा दाखल

Related Posts
1 of 1,487

अधिकारी होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने, त्याने नैराश्यातून गुरुवारी सकाळी औरंगाबाद येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. (Shocking! Suicide of a youth due to failure in competitive examination)

धक्कादायक !अल्पवयीन मुलीवर पित्याकडून अत्याचार , गुन्हा दाखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: