धक्कादायक ! धावत्या दुचाकीने अचानक घेतला पेट अन्…

0 343

 

नाशिक – धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune Highway) घडली आहे.भीमा संतु कापडी (वय ४१) यांचा भाजून मृत्यू झाला.

 

ते सिन्नरच्या दिशेने जात असताना ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सिन्नरच्या गुरेवाडी फाट्याजवळ त्यांच्या धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतला. अवघ्या काही वेळातच ते ९० टक्के भाजले. ही घटना पाहताच रस्त्यावर धावाधाव सुरु झाली. भीमा यांच्या बचावासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यांना तात्काळ नाशिकमधील शासकीय रुग्णालयात घेऊन जात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. पण तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

 

Related Posts
1 of 2,422

काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर असलेल्या मोहदरी घाटात कारने पेट घेतल्याची घटना घडली होती. कार चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवत कार रस्त्याच्या कडेला उभी केली आणि तो त्यातून बाहेर पडला. त्यामुळे त्याचे प्राण वाचू शकले. पण या बर्निंग कार त्यानंतर चर्चेचा विषय ठरली होती. या घटनेची माहिती तात्काळ माळेगाव एमआयडीसीला देऊन अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. त्यांची सेवा पोहचेपर्यंत मात्र आगीने पूर्ण कारला वेढा दिला होता. त्यामुळे अवघ्या काही क्षणात कार जळून पूर्ण खाक झाली होती.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: