धक्कादायक ! अजूनही श्रीगोंद्यात शहरात गुटख्याची खुलेआम विक्री आणि वाहतूक; मात्र ..

श्रीगोंदा ;- श्रीगोंदा (Shrigonda) तालुका गुटख्याचे (Gutkha)आगार आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होत असताना आज पुन्हा अगदी मनमोकळे पणाने गुटखा वाहतूक आणि ठोक विक्रेत्याकडून किरकोळ दुकानदारांना दुचाकीवर गुटखा पोहचविला जात असल्याचे निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील काष्ठी रोडवर गुटखा चोरीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत एका पोलिसाला अहमदनगर पोलीस मुख्यालयी जमा केले त्यावेळी एक बनावट आरोपी पोलिसांनी जेरबंद केला होता त्यानंतर गुटखा काही प्रमाणात कमी झाला असेल अशी सर्वांची खात्री झाली मात्र गुटखा तस्करी अगदी जोमाने सुरु झाली. आज सकाळी एक व्यक्ती आपल्या दुचाकीवरून गुटख्याच्या मोठ्या मोठ्या गोण्या घेऊन लिंपणगाव गावातील सिद्धेश्वर पान सेंटर या दुकानात दुकानदाराला गुटखा पोहोच करताना दिसून आला. त्याच्याकडे दुचाकीवर साधारण कमीतकमी लाख रुपयाचा तरी माल असेल अशी परिसरात चर्चा चालू होती गुटखा सर्वाना देत तो व्यावसायिक अगदी बिनधास्त फिरत होता . त्यावेळी तेथील काही लोकांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले या गुटख्यावाल्याचे खूप मोठे गोडावून आहे त्या ठिकाणी कर्नाटक येथून ट्रकने माल उतरवला जातो महिन्याची कोट्यवधी रुपयांची उलाढाल आहे त्याने श्रीगोंदा पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन यांच्या आशीर्वादाने गुटखा तस्करी अगदी जोमात सुरु आहे.
गृहमंत्र्यांच्या आदेशाला श्रीगोंद्यात केराची टोपली ?
Related Posts
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी झालेल्या कॅबिनेट मध्ये अवैध गुटखा वाहतूक आणि विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असताना श्रीगोंद्यात मात्र खुलेआम गुटखा विक्री आणि वाहतूक होत आहे त्यामुळे श्रीगोंदा पोलिसांनी गृहमंत्री यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
श्रीगोंदा पोलीस आदेश मानतात तरी कोणाचा ?
श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचाऱ्यांचे अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांशी सलगीचे संबंध आहेत त्यामुळे त्यांना कारवाई करण्यास अडचण होत असावी मात्र त्यामुळे श्रीगोंदा पोलीस नेमका कोणाचा आदेश मानतात हे मात्र समजण्यास तयार नाही .