धक्कादायक! जिल्ह्यामध्ये दारू पिऊन मुलाने केला वडिलांचा खून..

0 306
राहुरी –    दारू पिऊन (Drinking alcohol) पत्नीसमवेत वाद घालणाऱ्या मुलाला समजून सांगण्यासाठी गेलेल्या बापाला मुलाकडून बेदम मारहाण करून जीवे ठार मारल्याची (Son kills father) धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे घडली आहे. या  प्रकरणात आरोपी मुलगा ज्ञानेश्वर विठ्ठल हारदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Shocking! Son kills father in district after drinking alcohol ..)
  या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर हारदे हा दारू पिऊन पत्नीशी वाद  घालत असे २७ ऑक्टोंबर बुधवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पत्नी सुनिता हारदे यांच्याशी ज्ञानेश्वर हारदे हा दूध काढण्याच्या कारणावरून वाद घालत होता. दोघांमध्ये सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी वडील विठ्ठल तुळशिराम हारदे (७२ वर्षे) यांनी पत्नीशी वाद घालू नको असे सांगितल्याचा राग आल्याने ज्ञानेश्वर याने वडिलांना मारहाण केली. यामध्ये वडील अत्यवस्थ होऊन जागेवर पडल्यानंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

जिल्ह्यात खळबळ , एस. टी चालकाने गळफास घेऊन केली आत्महत्या 

Related Posts
1 of 1,603

परंतु तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी विठ्ठल हारदे यांना मृत घोषित केले. पोलिसांना घटनेची माहिती समजताच आरोपी ज्ञानेश्वर हारदे यास ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे व सहायक पोलीस निरीक्षक नीरज बोकिल यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नीरज बोकिल हे करीत आहेत.(Shocking! Son kills father in district after drinking alcohol ..)

हे पण पहा – तो दाढीवाला कोण एनसीबीच्या अधिकार्‍यांना माहीत आहे असा खळबळजनक गौप्यस्फोट नवाब मलिक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: