धक्कादायक ! झोपलेल्या भावंडांवर घरात घुसून गोळीबार, एक जखमी

0 188

जळगाव –  जळगाव शहरातील कांचननगर परिसरात  आज सकाळी अज्ञात 4 ते 5 हल्लेखोरांनी  साडेआठच्या सुमारास सपकाळे कुटुंबीयांच्या घरात घुसून गोळीबार केला आहे. या हल्ल्यात एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. रिक्षातून आलेल्या 4 ते 5 हल्लेखोरांनी कांचननगरातील मध्यवर्ती भागातील एका घरात घुसून, झोपेत असलेल्या 2 भावंडांवर गोळीबार केला. यावेळी हल्लेखोरांनी 4 ते 5 राऊंड फायर केले. या हल्ल्यात हाताला गोळी लागून एक जण जखमी झाला आहे. या भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात  एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कांचननगर परिसरात राहणारे मुरलीधर सपकाळे यांच्या घरावर अज्ञात 4 ते 5 हल्लेखोरांनी आज सकाळी गोळीबार केला. मुरलीधर सपकाळे हे घराबाहेर खाटेवर झोपलेले होते. तर त्यांची दोन्ही मुले आकाश व सागर सपकाळे हे घरात झोपलेले होते. रिक्षातून आलेल्या हल्लेखोरांनी घरात घुसून झोपेत असलेले आकाश व सागर यांच्या अंगावरील चादर ओढून, गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. यावेळी हल्लेखोरांसोबत झटापट झाल्याने दोघे बालंबाल बचावले. झटापटीत आकाशच्या हाताला गोळी लागल्याने तो जखमी झाला. यावेळी झटापटीत हल्लेखोरांपैकी एक जण खाली पडल्याने त्याच्या डोक्याला जबर लार लागला. रक्तस्त्राव झाल्याने तो घटनास्थळीच पडून होता. या प्रकारानंतर हल्लेखोर पळून गेले.

साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह ६ जणांना अटक

या घटनेत 4 ते 5 राऊंड फायर झाले असून घरात आणि आजूबाजूला काडतुसे पडलेली आहेत. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळी गावठी पिस्तुल सोडून पळ काढला आहे. हा हल्ला कुणी आणि का केला, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचा अंदाज आहे.

हे पण पहा – रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर

Related Posts
1 of 1,487
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: