धक्कादायक ! शिवसेना आमदाराच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या; चर्चंना उधाण

0 695
Shocking! Shiv Sena MLA's wife commits suicide by strangulation; Churches abound
प्रतिनिधी DNA मराठी टीम
मुंबई –  शिवसेना (Shiv sena)आमदार मंगेश कुडाळकर(Mangesh Kudalkar) यांच्या पत्नी रजनी कुडाळकर (Rajni Kudalkar)यांनी आपल्या राहत्या घरी रविवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रजनी या ४२ वर्षांच्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आमदाराच्या पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती समोर येताच परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना तोंड फुटलं आहे.
या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी सर्वजण घरात असताना रजनी यांनी स्वत:च्या बेडरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहितीसमोर आली आहे. रजनी कुर्लाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या द्वितीय पत्नी होत्या.पहिल्या पत्नीचा काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाल्याने त्यांनी दुसरा विवाह केला होता.
Related Posts
1 of 2,357

पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रजनी यांचा मृतदेह ताब्यात घेतल्या. रजनी यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं यासंदर्भातील माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी त्यांनी घरगुती वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. सह पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला पोलिसांना महिलेने गळफास घेतल्याची माहिती कॉलवर मिळाली होती.

दरम्यान रात्री उशिरापर्यंत मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पंचनामा आणि चौकशी करत होते. या प्रकरणासंदर्भात नेहरूनगर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: