धक्कादायक ! बलात्कार पीडितेला मदतीच्या बहाण्यानं लुटलं, गुन्हा दाखल

0 231
औरंगाबाद – औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या दाखल झालेल्या गुन्हामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या बलात्कार प्रकरणातील 30 वर्षीय पीडितेला (Rape victim ) एका तरुणाने तब्बल 20 लाखांना गंडा घातला आहे.आरोपी तरुणाने मदत करण्याच्या बहाण्याने आणि दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवत पीडितेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने औरंगाबादेतील जीन्सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.(Shocking! Rape victim robbed under pretext of help, case filed)
या प्रकरणात नदीम शेख अलिमोद्दीन शेख या 35 वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या   30 वर्षीय पीडित तरुणीने सिडको पोलीस ठाण्यात एका राजकीय पक्षाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्याविरोधात मागच्या वर्षी बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणात पीडितेच्या काकांच्या ओळखीतील असलेला नदीम याने गुन्हा दाखल करण्याच्या कायदेशीर प्रक्रियेत पीडितेला मदत केली होती.  पोलीस तुझ्या घरी येऊन झाडाझडती घेतील, त्यात तुझ्या वडिलांच्या विम्याचे दहा लाख रुपये आणि बहिणीचे पैसे पोलिसांच्या हाती लागल्यास तुझ्यावर नको ते आरोप होऊ शकतात. त्यामुळे तुझ्याकडील सर्व रक्कम माझ्याकडे ठेवायला दे, त्या रकमेचा दुप्पट परतावा देतो, असं आमिष नदीमने पीडितेला दाखवलं. त्यामुळे पीडितेनंही वडिलांच्या विम्याचे दहा लाख, बहिणीचे 5 लाख आणि अन्य पाच लाख अशी एकूण 20 लाखांची रक्कम आरोपीला दिली.
Related Posts
1 of 1,608

दरम्यान, दोघांमध्ये मैत्री वाढून प्रेमसंबंधही सुरू झाले. न्यायप्रविष्ट प्रकरणं निकाली लागल्यानंतर लग्न करू असं आमिषही आरोपीनं दाखवलं. जुलै 2021 पासून पीडितेनं आरोपीकडे आपले पैसे मागण्यास सुरुवात केली. पण आरोपीनं विविध कारणं देत पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. तसेच आरोपीनं पीडितेवर विविध आरोप करत कॅनॉट प्लेसमध्ये बोलावून तिला मारहाण केल्याचंही पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.(Shocking! Rape victim robbed under pretext of help, case filed)

हे पण पहा – नऊ ते दहा दिवसात चौकशी पूर्ण करून शासनाला अहवाल दिला जाईल – राधाकृष्ण गमे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: