धक्कादायक ! वर्दीचा धाक दाखवत पोलीस उपनिरीक्षकानेच केला बलात्कार; गुन्हा दाखल

0 414
Isma was harassing 'that' minor girl for 6 months ..!

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

नागपूर –  नागपूर पोलीस (Nagpur Police) दलामध्ये खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे . नागपूर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने (police sub-inspector) २३ वर्षीय  तरूणीवर वर्दीचा धाक दाखवत बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या पोलीस उपनिरीक्षकाची इंस्टाग्रामवर (Instagram) पीडित तरूणीशी  ओळख झाली होती. अक्षय ठाकरे (रा. वाशिम) असे आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हा पोलीस अधिकारी फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठाकरे हा हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्याची गेल्या सहा महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवरून कपीलनगरात राहणाऱ्या पीडीत २३ वर्षीय तरूणीशी ओळख झाली होती. ती एका कंपनीसाठी इव्हेंट मँनेजमेंटचे काम करते. भेट झाल्यानंतर दोघांचे सूत जुळले. यानंतर त्याने वर्दीचा धाक दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती दोन महिन्यांची गर्भवती झाली.

Related Posts
1 of 2,420

पीडितेने अक्षय ठाकूरला सांगितले असता त्याने तिला धमकी देऊन गर्भपात करण्यास सांगितले. मात्र, तरूणीने त्याला लग्नाची गळ घातली. त्याने नकार दिल्यामुळे पिडितेने कपीलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठाकरेवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: