
श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील सुरोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे कर्ज असताना सोसायटीचा बनावट दाखल जोडून खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून सहाय्यक निबंधक कार्यालयात याबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
श्रीगोंदा तालुक्यातील सुरोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चे सभासद कांताबाई साहेबराव वागस्कर यांच्यावर सोसायटीचे पशुपालन साठी घेतलेले 1 लाख 50 हजार रुपये कर्ज तर चालू थकबाकी कर्ज 2 लाख 50 हजार असे एकूण चार लाख रुपये सोसायटी चे कर्ज असताना सोसायटीच्या सचिवांची बनावट सही मारून बनावट दाखला जोडून दुय्यम निबंधक कार्यालय श्रीगोंदा या ठिकाणी खरेदीचा दस्त नोंदविण्यात आला सदर प्रकार गावातील काही सजग नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सोसायटी मध्ये जाऊन कांताबाई वागस्कर यांच्याकडे असलेल्या कर्जाबाबत चौकशी केली असता सोसायटी च्या सचिवाने कर्ज असल्याचा दाखल त्यांना दिला.
त्यावेळी कर्ज असताना खरेदीखत करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय या ठिकाणी चौकशी केली असता त्यांनी सांगितले दाखला खरा आहे का खोटा आहे ते पडताळून पाहण्याची आमच्याकडे कुठलीही सोय नाही त्यामुळे खरेदीखत झाले आहे मात्र याबाबत काही नागरिकांनी श्रीगोंदा येथील सहाय्यक निबंधक कार्यालय या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही त्यामुळे यावर सहाय्यक निबंधक काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
संबंधित लोकांवर सोसायटी गुन्हा दाखल करणार का ?
कर्ज असताना सुरोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चा बनावट दाखल जोडून खरेदीखत करण्यात आले त्यामुळे यामध्ये संस्थेची फसवणूक करण्यात आली आहे त्यामुळे संबंधित लोकांवर सोसायटी गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सहाय्यक निबंधक काय कारवाई करणार ?
सोसायटी चा कोरा दाखला तसेच सोसायटी चे शिक्के संबंधित लोकांना कोठून मिळाले अथवा यामध्ये खुद्द सचिवच सहभागी आहेत की काय? याचाही शोध घेऊन सहाय्यक निबंधक नेमकी कोणती व कोणावर कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.