धक्कादायक ! बारमध्ये सुरू होता अश्लील नृत्य; पोलिसांनी मारला छापा अन् ..

0 402
Exposing a sex racket operating under the name Spa Center; Major police action
मुंबई –  मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) समाजसेवा शाखेच्या (Social Services Branch) पथकाने मोठी कारवाई करत एका बारवर छापा (Police raid) टाकून तब्बल २७ जणांना अटक केली आहे तसेच बारमध्ये असणाऱ्या १२ महिलांची सुटका देखील करण्यात आल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज सकाळी सोमवारी पहाटे समाजसेवा शाखेच्या पथकाने बारवर छापा टाकला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बारमध्ये अश्लील नृत्य आणि गैरकृत्ये सुरू असल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या पथकाला मिळाली होती. याबाबत खात्री पटल्यानंतर पथकाने छापेमारी केली. बारमध्ये केवळ ओळखीतील लोकांनाच प्रवेश दिला जात होता, अशीही माहिती मिळाली होती. या छापेमारीत बारमधून २७ जणांना अटक केली. तर १२ महिलांची सुटका केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Posts
1 of 2,326

मागील आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईच्या मालाड परिसरात एका बारमध्ये छापा मारला होता. त्यावेळी जवळपास ३० जणांना अटक केली होती. तर २५ महिलांची सुटका करण्यात आली होती. शहर गुन्हे शाखेच्या समाजसेवा शाखेने ही कारवाई केली होती.( Shocking! Pornography begins in the bar; Police raid)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: