धक्कादायक ..! कौटुंबिक वादातून विवाहित महिलेने घेतलं विष अन्…

0 222
Excitement in the district! Farmers took poison due to fall in onion prices.

 

 

मध्यप्रदेश – कौटुंबिक वादातून एका विवाहीत महिलेने (Married Woman) विषारी द्रव्य प्राशन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वरणगाव येथील आयुध निर्माणी जवळील पवननगरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.संगीता रमेश बारेला असं मयत विवाहितेचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील नेपानगर येथील मुळ रहिवाशी असलेले व ह. मु. आयुध निर्माणी जवळील पवननगरमध्ये राहत आसलेले रमेश लखन बारेला हे आपल्या पत्नी संगीता रमेश बारेला हे मोलमजुरीसाठी आले होते. दि २९ मे रविवार रोजी या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर संगीता बारेला (वय २७) या विवाहितेने दुपारी दिड वाजेच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन केल्याने तीला वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला.

 

Related Posts
1 of 2,107

याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला रमेश लखन बारेला यांच्या खबरी वरून अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर पाटील हे करीत आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: