धक्कादायक..! कामाचे पैसे न दिल्याने एकाची आत्महत्या

0 190
Shocking! Another model commits suicide, another incident in three days

 

अहमदनगर – व्यवहाराच्या नैराशातून तसेच पैशांची मागणी केल्यानंतर होत असलेल्या दमदाटीला कंटाळून एकाने आत्महत्या केली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

राजेंद्र दामोदर सोनवणे (रा. केडगाव, अहमदनगर) असे मयताचे नाव आहे. या संदर्भात मयताची पत्नी कौशल्या सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परमेश्वर मारूती विधाते उर्फ मामा,, सुनील रामदास घेंबुड आणि अनिल बाबा लोंढे (सर्व रा. केडगाव, अहमदनगर) यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Related Posts
1 of 2,177

राजेंद्र सोनवणे केडगाव वास्तव्यास परिसरात होते. सेंट्रींगचे काम करून उदरनिर्वाह करत होते. विधाते, थेंबुड आणि लोंढे यांच्याकडून सोनवणे यांना काम मिळत असे. या कामाचे पैसे सोनवणे यांना दर मंगळवारी ते देत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोनवणे यांना कमी पैसे देत होते. तसेच, पैशांची मागणी केल्यानंतर दमदाटी करत होते.

 

या नैराशातून सोनवणे यांनी १ जूनच्या मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली, आत्महत्येपूर्वी सोनवणे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये सर्व हकीगत लिहली आहे. पोलिसांनी पंचनाम्यादरम्यान चिठ्ठी ताब्यात घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे अधिक तपास करत आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: