धक्कादायक! अनैतिक संबंधास अडथळा; पत्नीने काढला पतीचा काटा

पैठण – अनैतिक संबंधास (Immoral relationship) अडथळा ठरत असलेल्या व दररोज मारहाण करणाऱ्या पतीचा (Husband) पत्नीने (Wife) प्रियकरासोबत(Boyfriend) मिळून शेवगाव येथे खून केला. तर पैठण तालुक्यातील हर्षी शिवारात मृतदेह आणून अर्धवट जाळून फेकून दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पत्नीसह तीघांना अटक करण्यात आली आहे.
आशिष विजय राऊत (रा. सावळी. जि. यवतमाळ), पत्नी सुरेखा जाधव (रा. शेवगाव) आणि संगीत शामा जाधव (रा.सावळी, जि. यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. देविदास रामभाऊ जाधव (वय ४५, रा. शेवगाव, जिल्हा अहमदनगर) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसह पाचोड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून संशयितांचा छडा लावून नागपूर येथून शनिवारी (दि. २१) पाहटे अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, पाचोड-पैठण रस्ताजवळ थेरगाव-हर्षी परिसरात नालीत एका व्यक्तीचा मृतदेह ब्लॅकेट गुंडाळून जाळून फेकल्याचे घटना समोर आली होती. औरंगाबाद ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेसह पाचोड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपीचा छडा लावला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुरेश माळी हे करीत आहेत.