धक्कादायक ! पाण्यात बुडून सख्ख्या दोन बहिणींच्या मृत्यू ….

0 314

उमदी-   उमदी (ता. जत) येथे ओढ्यात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. लक्ष्मी शिवानंद ऐवळे (११) व रेणुका ऐवळे (७) अशी मृतांची नावे आहेत. उमदी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

दुपारी दीडच्या सुमारास दोघी बहिणी व त्यांचा भाऊ मायाप्पा (६) असे तिघे घरानजीक असणाऱ्या ओढ्यात पोहायला गेले. लक्ष्मी व रेणुका पहिल्यांदा ओढ्यात उतरल्या होत्या, तर मायाप्पा कपडे काढत होता. काही वेळातच दोघीही ओढा पात्रात दिसेनात हे पाहून मायाप्पा भीतीने रडू लागला. हे पाहून ओढ्याच्या  काठावर जनवारे चारण्यासाठी फंडातून आलेले संभाजी माने व प्रकाश  वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

कोकणात होणार मोठा उलटफेर,नारायण राणेंची जागा निलेश राणे लढवणार?

Related Posts
1 of 1,603

मायाप्पाने घडला प्रकार  दोघांना सांगितला. यानंतर संभाजी व म्हणून प्रकाश यांनी ओढा पात्रात उड्या   मारल्या. त्यांनी दोन्ही बहिणींचा शोध घेत त्यांना बाहेर काढले व उमदी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

हे पण पहा – वॉर्ड बॉयची रुग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: