धक्कादायक! दारू पाजल्यानंतर दगडाने ठेचून केली हत्या; दोन आरोपींना अटक

0 223
Shocking! A mentally ill man stabbed his wife to death

नागपूर – नागपूर शहरातून (Nagpur City) पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. दोन गुन्हेगारांनी एका मनोरुग्णाला सिगारेट आणि दारू पाजल्यानंतर दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघकीस आली आहे. गुरुवारी सकाळी ही घटना समोर आली आहे.संदीप किसनराव दुपारे (वय ४०) असे मृताचे नाव आहे.तो मानेवाडा-बेसा मार्गावरच्या कपिलनगरात राहत होता.

उज्ज्वल भिसीकर (वय २७) आणि राकेश चैनसिंग महेश्वर (वय ३०, रा. मानेवाडा) अशी आरोपींची नावे आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार संदीपची मानसिक अवस्था चांगली नव्हती. त्याचा उपचारही सुरू होता. अनेकदा तो घरून निघून जायचा. बाटल्या, कचरा वेचून विकायचा अन् काहीही खाऊन कुठेही झोपायचा. अधूनमधून घरी परतायचा. त्यामुळे घरच्यांना त्याची तशी सवय झाली होती.

Related Posts
1 of 2,420

आरोपी उज्ज्वल आणि राकेश या दोघांना दारू, गांजाचे व्यसन आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री ते अंबाशिवशक्ती नगरातील गॅस गोदामाजवळ नशा करीत बसले होते. तेथे त्यांच्याजवळ संदीप आला. त्याने आधी सिगारेट मागितली. आरोपींनी गांजाने भरलेली सिगारेट दिल्यानंतर तो तेथेच बसला. त्यामुळे आरोपींनी त्याला दारूही पाजली. नशा डोक्यात भिनल्यानंतर संदीपची मानसिक अवस्था बिघडली. तो आरोपींना शिवीगाळ करू लागला. त्यामुळे त्यांनी संदीपला लाथाबुक्क्यांनी मारले आणि नंतर डोक्यावर दगडाने ठेचून आरोपी पळून गेले.

सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना संदीप रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. त्यांनी माहिती देताच अजनीचा पोलीस ताफा तेथे धडकला. त्यांनी संदीपचे फोटो काढून ते परिसरातील नागरिकांना दाखवून त्याची ओळख पटवली. दरम्यान, संदीपचा भाऊ प्रदीप किसनराव दुपारे (वय ३७) तेथे पोहचला. मृत व्यक्ती संदीपच असल्याचे त्याने सांगितल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना आरोपीची ओळख पटली. त्यामुळे पोलिसांनी दुपारी उज्ज्वल आणि राकेशला अटक केली. त्यांनी हत्येची कबुली दिली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: