DNA मराठी

धक्कादायक ! गोहत्येच्या संशयावरून सुरक्षा रक्षकाची हत्या, 4 जणांना अटक

0 155
Shocking! Murder of security guard on suspicion of cow slaughter, 4 arrested

 प्रतिनिधी DNA मराठी टीम 

दिल्ली –  गोहत्येच्या ( cow slaughter) संशयावरून एका व्यक्तीवर काही गोरक्षकांनी हल्ला करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना दक्षिण-पश्चिम दिल्लीतील छावला भागात रविवारी रात्री घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात प्रथम अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करत चार जणांना अटक केली आहे. मृत हा सुरक्षा रक्षक (security guard)म्हणून काम करत होता. तो एका फार्महाऊसमध्ये सुरक्षा रक्षक होता. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.  (Shocking! Murder of security guard on suspicion of cow slaughter, 4 arrested)

या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री दक्षिण पश्चिम दिल्लीतील छावला भागातील एका फार्महाऊसवर एका गायीची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली मात्र पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच काही लोक तेथे पोहोचले आणि त्यांनी दोन-तीन जणांना मारहाण केली. पोलिसांनी तिन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.यानंतर तिघांनाही पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली.

Related Posts
1 of 2,448
याचदरम्यान पोलीस ठाण्यात एका जखमीची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याला पुन्हा रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. फार्महाऊसचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करताना पोलिसांनी आता चार आरोपींना अटक केली असून आणखी अटक होण्याची शक्यता आहे.(Shocking! Murder of security guard on suspicion of cow slaughter, 4 arrested)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: