धक्कादायक ! चवदार सांभार बनवले नाही म्हणून आई आणि बहिणीची हत्या

0 192

 कर्नाटक –   जेवण्यासाठी आईने आणि बहिणीने चवदार सांबार बनवले नाही या शुल्लक कारणावरून एका तरूणाने आपली आई (Mother) आणि बहिणी (Sister) ची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना कर्नाटका राज्यतील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील परिसरात घडली आहे. या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पार्वती नारायण हसलर आणि रम्या नारायण हसलर अशी मयत मायलेकींची नावे आहेत. तर मंजुनाथ नारायण हसलर असे आरोपी तरुणाचे नाव आहे. (Shocking! Murder of mother and sister for not making tasty sambar)

आरोपी मंजुनाथ हा मद्यपी असल्याचे पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले. तो अनेकदा घरात भांडणं करीत असे. बुधवारी, जेव्हा तो घरी पोहचला आणि जेवायला बसला, तेव्हा सांभर चवदार झाले नाही म्हणून त्याचे बहीण आणि आईशी भांडण झाले. या व्यतिरिक्त त्याच्या आईला कर्ज घेऊन त्याच्या बहिणीसाठी फोन खरेदी करायचा होता, यालाही त्याचा विरोध होता.

अजित पवार यांनी पाळला शब्द, आमदारांना दिला दसऱ्याचे गिफ्ट

Related Posts
1 of 1,463

वादाच्या वेळी, आईने मुलगा मंजुनाथला सवाल केला होता की, मी आपल्या मुलीसाठी फोन खरेदी करावा की नाही हे सांगणारा तू कोण आहेस. आईच्या अशा बोलण्यामुळे मंजुनाथ चिडला आणि त्याने घरात ठेवलेल्या देशी बनावटीच्या पिस्तुलाने त्याच्या आई आणि बहिणीवर गोळ्या झाडल्या. विशेष म्हणजे, मंजुनाथचे वडील घरी परतल्यावर ही बाब उघडकीस आली. मंजुनाथचे वडील घरात येताच त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलीला मुलाने ठार मारल्याचे कळले. पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले की, आरोपीविरुद्ध भादंविच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.(Shocking! Murder of mother and sister for not making tasty sambar)

 हे  पण पहा –  शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या… | आ. मोनिका राजळे आक्रमक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: