धक्कादायक! लग्नाला विरोध केल्यानं मुलीच्या आईची हत्या, आरोपीला अटक

0 325

 कोल्हापूर-    आजरा तालुक्यातील आल्याचीवाडी येथे लग्नाला विरोध केल्यानं मुलीच्या आईची हत्या कारण्यात आली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी गुरुप्रसाद माडभगत याला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेत मृत झालेल्या महिलेचं नाव लता परीट असं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातल्या आल्याचीवाडी परिसरात  ही घटना उघडीस  आली आहे . लता परीट या शेतात कामासाठी गेल्या असता तिथं त्यांची हत्या करण्यात आली आहे . आजरा पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाची चक्र फिरवत आरोपी गुरुप्रसाद माडभगत याला अटक केली असून तपास सुरु आहे. लता परीट यांचा मृतदेह शवविच्छेदन करुन पोलिसांनी संबंधित महिलेच्या ताब्यात दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची माहिती कळताच परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

हे पण पहा – महिला सरपंचाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून मारहाण

Related Posts
1 of 1,603

आजरा पोलिसांनी आरोपी गुरुप्रसाद माडभगत याच्याकडं चौकशी केली असता त्यानं परीट यांनी त्यांच्या मुलीसाठी लग्नाचा दिलेला प्रस्ताव नाकारल्याने माडभगत यांनं हल्ला केला. माडभगत यानं लता परीट यांचा खुरप्यानं हल्ला करुन खून केल्याचं समोर आलं आहे. आजरा पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

बंद करून दाखवले याचे श्रेय घेणार का? नितेश राणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: