धक्कादायक! हुंड्यासाठी विवाहितेचा खून, गुन्हा दाखल

0 202

अहमदनगर –  लग्नावेळी ठरलेले हुंड्याचे पाच लाख रुपये न दिल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील अरणगाव येथे घडली. योगीता नीलेश दळवी (वय २२ रा. अरणगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरूद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मयत योगीताचे वडिल देवराम आसाराम गव्हाणे (वय ५२ रा. वडगाव गुप्ता ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

योगीताचा पती निलेश बाळासाहेब दळवी, सासू आशा बाळासाहेब दळवी, सासरा बाळासाहेब रामभाऊ दळवी, भाया पप्पू बाळासाहेब दळवी, जाव मेघा पप्पू दळवी (सर्व रा. अरणगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

गव्हाणे यांच्या मुलीचे निलेश दळवी याच्यासोबतलग्न झाले होते. लग्नावेळी सासरच्यांनी पाच लाख रुपये हंडा मागितला होता. हुंडा दिला नाही, म्हणून सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता. योगीताने फोन करून माहेरच्या लोकांना हा प्रकार सांगितला होता. योगीता तिच्या घरी असताना आरोपींनी तिला गळफास देऊन जीवे ठार मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान योगीताला नगरमधील रुग्णालयात आणल्यानंतर तिच्या माहेरच्या लोकांनी तेथे गर्दी केली होती. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

दारुसाठी पैसे न दिल्याने मुलाने केला आपल्या आईचा खून , आरोपीला अटक

Related Posts
1 of 1,487

घटनास्थळी कोतवाली पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दुसऱ्या दिवशी योगीताच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जारवाल करीत आहेत.

हे  पण पहा –  शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या… | आ. मोनिका राजळे आक्रमक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: