धक्कादायक ! मुलाची हत्या करुन आईने लपवला घरामध्येच मृतदेह …

0 285
रोहतक –  हरियाणातील रोहतक शहरात आईने आपल्या धाकट्या मुलाच्या मदतीने आपल्या मोठ्या मुलाची हत्या करून तिचा मृतदेह घरातच पुरलावल्याची धक्कादायक घडण उघडीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपी मायलेकांनी अटक केली आहे. घरातील एकाच खोलीत नवीन टाईल्स पाहून आत्या आणि तिच्या नवऱ्याला संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली होती.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि 22 वर्षीय कर्मपाल उर्फ राहुल अडीच महिन्यांपासून बेपत्ता होता. त्याची आई आणि भावानेच हत्या करुन मृतदेह घरात पुरला आहे, अशी तक्रार राहुलच्या आत्या आणि तिच्या नवऱ्याने पोलिसात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत आरोपी महिलेला अटक केली. त्यांच्या घरातून राहुलचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. राहुल दर आठ-पंधरा दिवसांनी आपल्या आत्याच्या घरी भेटायला यायचा. मात्र दोन महिने उलटून गेले, तरी तो न आल्यामुळे त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आत्या आणि तिचे यजमान रोहतकजवळील सैमाण गावात त्याला भेटायला आले.

तिथे एकाच खोलीत नवीन टाईल्स पाहून त्यांच्या संशयाचं खात्रीत रुपांतर झालं. त्यांनी तडक पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.पोलिसांनी फरिदाबादमधून आई, तर रोहतकमधून मुलाला अटक केली. सैमाण गावातील घराची जमीन उकरुन त्यातून राहुलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र घरगुती वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज आहे.

 

“चंद्रकांत पाटील आपलं जितक वय आहे तितकी शरद पवार यांची संसदीय कारकीर्द आहे” 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: