धक्कादायक ! प्रियकराच्या मदतीने आईने केली 10 वर्षाच्या मुलाची हत्या; जाणुन घ्या संपूर्ण प्रकरण

UP Crime: यूपीच्या बिजनौरमध्ये एका आईने प्रियकरासह आपल्या 10 वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या केली. खून केल्यानंतर मृतदेह शेतात फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. 16 जानेवारी रोजी गावापासून काही अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात मुलाचा मृतदेह आढळून आला होता.
एसपी ग्रामीण रामराज यांनी सांगितले की, 16 जानेवारी रोजी चांदपूरच्या लिंदरपूर गावातील रहिवासी उमेश कुमार यांनी पोलिसांना माहिती दिली की त्यांचा 10 वर्षांचा पुतण्या बेपत्ता आहे, जो एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बाहेर गेला होता. त्याचा खूप शोध घेतला, पण कुठेच सापडला नाही.
16 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास गावापासून काही अंतरावर एका शेतात मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या गळ्यात दोरी अडकली होती. त्याची दोरीने गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे दिसत होते.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करून तपास करण्यात आला. तपासानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारे मुलाच्या आईला चौकशीसाठी बोलावले. पोलिसांनी कडक चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण समोर आले.
मुलाच्या आईने पोलिसांना सांगितले की, 16 जानेवारीला गावात पूजेचा कार्यक्रम होता, त्यात घरचे लोक गेले होते. तिचा नवरा बाहेर गेला होता. शेजारी राहणाऱ्या टिंकू सैनीसोबत महिलेचे अवैध संबंध होते. तो आरोपी महिलेच्या घरी आला होता. त्याचवेळी महिलेच्या मुलाने दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले आणि ही बाब वडिलांना सांगू असे सांगून मुलगा घरातून निघून गेला.
दोरीने गळा आवळून गुन्हा केला
यानंतर टिंकूसह मुलाच्या आईने मुलाला शोधून शेतात दोरीने गळा आवळून खून केला. खून करून ती तेथून निघून गेली.महिलेची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर टिंकू सैनीला अटक केली.
याचा पोलिसांना सुरुवातीपासूनच संशय होता, कारण मुलाच्या हत्येनंतर आई एकदाही रडली नाही किंवा तिच्या डोळ्यात अश्रूही आले नाहीत. या सर्व बाबी लक्षात घेऊन पोलिसांनी आईची चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.