धक्कादायक..! पेन्शनच्या पैशासाठी मुलाकडून आईला मारहाण; गुन्हा दाखल

0 190
Young man beaten to death on suspicion of mobile theft; Death of a young man

 

तिसगाव – पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील सैनिकाच्या पत्नीस पोटचा मुलगा व सुनेकडून पेन्शनच्या पैशासाठी दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याची फिर्याद मुलगा व सुनेच्या विरोधात पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

 

 

पाथर्डी पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार घाटशिरस येथील जनाबाई श्रीराम पालवे यांचे पती माजी सैनिक होते. त्यांच्या निधनामुळे जनाबाई पालवे यांच्या नावावर बँकेत पेन्शन जमा होत आहे. ही पेन्शन आम्हाला देत जा म्हणून मुलगा राजू श्रीराम पालवे व सून अश्विनी राजू पालवे हे दोघे जनाबाई पालवे यांच्याकडे पेन्शनची मागणी करत सातत्याने त्यांना दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याची फिर्याद जनाबाई पालवे यांनी पाथर्डी पोलिसात दाखल केली आहे.

 

 

Related Posts
1 of 2,197

पैशासाठी पोटच्या मुलाकडून आईला होणाऱ्या मारहाणीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माजी सैनिकाच्या पत्नीवर घरातल्याच मुलाकडून व सुनेकडून होणाऱ्या मानसिक त्रासाविरोधात पोलीस प्रशासन आता नेमकी काय कारवाई करणार हे देखील महत्वाचे ठरणारे आहे.

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: