धक्कादायक! राज्यात ब्रिटिश महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

मुंबई – राज्याची राजधानी मुंबईमध्ये (Mumbai) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईमधील वांद्रे परिसरात ब्रिटिश महिलेचा (British women) विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीसांनी या प्रकरणात तत्काळ करवाई करत एका आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ब्रिटिश महिला यार्ट क्लब वांद्रे येथे पतीसोबत होती. बुधवारी रात्री 11 च्या सुमारास ती त्या क्लबमध्ये होती.
त्यावेळी आरोपी घनश्याम यादव यानं महिलेला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत होता. यानंतर पीडित महिलेनं त्याच्याकडे अनेकदा दुर्लक्षही केलं. त्यानंतर महिलेनं त्याच्या या वारंवार कृतीला कंटाळून तिनं त्याला समजही दिली. मात्र त्यानंतरही तो तसंच गैरकृत्य करत राहिला.
समज दिल्यानंतरही आरोपी यादव वारंवार गैरकृत्य करत असल्यानं महिलेनं त्याला जाब विचारत पोलिसांना पाचरण केलं. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी 354(ए),1, आय, 354, 509 भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवत घनश्यान यादव याला अटक केली असून अधिक तपास करत आहे.