धक्कादायक! ऑस्ट्रेलियात नोकरीच्या आमिष दाखवून ५८ तरुणांची लाखोंची फसवणूक

0 170
Shocking! Purchases made by adding fake filings while in debt

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

पुणे – ५८ तरुणांची ऑस्ट्रेलियात (Australia) नोकरीचे (Job) आमिष दाखवून बनावट व्हिसा (Fake visa) देऊन लाखो रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणात खडकवासल येथील एका ३६ वर्षाच्या तरुणाने  दिलेल्या फिर्यादीवरून कोथरुड पोलिसांनी जे एस सी ओव्हरसीज कन्स्लटंट च्या संचालक डॉ. स्नेहा जोगळेकर आणि वरुण जोगळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. (Shocking! Millions cheated out of 58 young people in Australia for job offers)
समोर आलेल्या माहितीनुसार हा संपूर्ण प्रकार ८ ऑगस्ट २०२० पासून सुरु होता. एका जाहिरातीवरुन फिर्यादी यांनी डॉ. स्नेहा जोगळेकर यांच्याशी संपर्क साधला होता . त्यावेळी जोगळेकर यांनी फिर्यादीस ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी लावतो, असे अमिष दाखविले. त्यांनी घरीच हाॅलमध्ये तरुणांच्या मुलाखती घेऊन त्यांना वेगवेगळ्या पदासाठी नोकरी देण्याचे आश्वासन दिले. काही जणांना हॉटेलमध्ये हाऊस किपिंग तर काहींना हॉटेलमध्ये वेगवेगळ्या कामासाठी नोकरी देण्याचे आमिष दाखविले.
Related Posts
1 of 2,326

फिर्यादी व इतर लोकांचा विश्वास संपादन करुन त्यांना ऑस्ट्रेलियन मॅरीटाईम क्रू हा खोटा व्हिसा दिला. त्यांच्याकडून वेळोवेळी ६ लाख रुपये घेतले पण नोकरी लावली नाही. फिर्यादी हे नोकरी न लावल्याने पैसे मागण्याकरीता गेले असताना त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. खोटे गुन्हे दाखल करु, अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्याबरोबर त्यांचा भाऊ व एक मित्र अशा तिघांसह इतरांची फसवणूक केली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राठोड अधिक तपास करीत आहे.

डॉ. जोगळेकर हिने सर्वांना ११ लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले. त्यातील २ लाख रुपये दिल्यावर व्हिसा मिळेल. त्यानंतर पुढील ४ लाख दिल्यानंतर तिकीट देऊ असे सांगितले होते. उरलेले ५ लाख तुमच्या पगारातून कापून घेतले जातील, असे सांगून या तरुणांचा विश्वास संपादन केला. त्यांना मॅरीटाईम क्रू चा व्हिसा पाठविला. त्याची या तरुणांनी चौकशी केली. तेव्हा तो फक्त सी पोर्टवर कामासाठीचा होता. नोकरीसाठी नव्हता. त्यानंतर जोगळेकर हिने आमची तिकडे कंपनी आहे. ती तुमची सर्व राहणे, जेवण, वाहतूक याची सोय करणार असल्याचे सांगितले. तसेच लॉकडाऊन असतानाही वंदेभारतम सेवेतून तुम्हाला पाठविणार असल्याचे सांगितले. शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलिया सरकारचा जी आर दाखवून त्यांचे विमान रद्द झाल्याचे सांगून फसवणूक केली. त्यानंतर त्यांना दरवेळी पुढचे वायदे करुन झुलवत ठेवले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: