DNA मराठी

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीचा परराज्यात विवाह अन्.. बलात्कार

0 359
A woman was molested and beaten after breaking into a house due to a dispute over farm land

 

अमरावती –   देशासह राज्यात बालविवाहाला (Child marriage) बंदी असताना हि अनेक ठिकाणी आज देखील बालविवाह होत आहे. अल्पवीय मुलीची (Minor Girl) तिच्या इच्छे विरोधात लग्न लावून देण्यात येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना राज्यातील अमरावती (Amravati) जिल्ह्यात घडली आहे.जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) जुन्नरदेव तालुक्यातील एका गावात 2021 मध्ये बालविवाह करण्यात आला होता. यानंतर पतीने तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्तापित केले. सासरच्या लोकांना कंटाळून ती पीडित मुलगी माहेरी आली तर माहेरी तिच्या आईने तिला मारहाण केली.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीतल्या वरुड तालुक्यातील एका गावातील14 वर्षीय मुलीचा मध्यप्रदेशात जुन्नरदेव तालुक्यातील एका गावात 2021 मध्ये बालविवाह झाला होता. या नंतर  तिथे त्या मुलीवर शारीरिक अत्याचार करण्यात आला. यावेळी सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून ती माहेरी आली. मात्र माहेरी आईने नवऱ्याकडे का जात नाही म्हणून तिला मारहाण केली. अखेर 22 एप्रिल रोजी तिने वरुड पोलिस ठाणे गाठून सर्व आपबिती पोलिसांना सांगितली. यानंतर पोलिसांकडून तपास करून पोलिस अधीक्षक आणि एचडीपी यांच्या मार्गदर्शनात 14 मे रोजी पीडित मुलीच्या आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला.

 

 

Related Posts
1 of 2,493

पती, सासू, मामा आणि मध्यस्थी करणाऱ्यांसह एकूण पाच जणांविरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व घटनाक्रम 1 एप्रिल 2021 ते 12 मे 2022 दरम्यान घडला आहे. ही घटना उघडकीस येताच वरुड पोलिसांनी गुन्हे दाखल करून ती केस मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील नवेगाव पोलीस ठाण्यात वर्ग करत अल्पवयीन मुलीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: