धक्कादायक ! प्रतिष्ठीत ब्रॕड कंपनीच्या डेरीमिल्क कॕडबरी मध्ये अळ्या

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे एका स्विटहोम दुकानातून ग्राहकाने घेतलेल्या प्रतिष्ठीत ब्रॕड कंपनीच्या डेरीमिल्क (Dairymilk) कॕडबरी मध्ये अळ्या आढळून आल्याने कंपनी सामान्य माणसाच्या जीवाशी खेळत असल्याने मुदत बाह्य संपलेल्या खाद्य पदार्थ वस्तु ग्राहकांच्या माथी मारतात यामुळे ग्राहकांच्या मध्ये संताप व्यक्त होत असून याकडे जिल्ह्यातील अन्न भेसळ विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे.
सविस्तर माहिती अशी कि दोन दिवसापूर्वी काष्टी गावातील व्यापारी ग्राहक पियुश कटारिया यांनी गावातील एका प्रतिष्ठीत स्विटहोमच्या दुकानातून खाण्यासाठी डेरीमिल्क कंपनीची कॕडबरी घरी घेऊन आले.घरी आल्यानंतर खाण्यासाठी कॕडबरी फोडली असता त्यातून अळ्या बाहेर आल्याचे दिसून आले. सदर पियुश कटारिया यांनी खरेदी केलेल्या स्विटहोम मध्ये जावून दुकानदारास सत्य परिस्थिती दाखविली त्यावर दुकानदाराने ग्राहकास उडवा उडवीची उत्तरे दिली.
त्यानंतर ग्राहकाने पुन्हा आणखी एक कॕडबरी खरेदी करुण दुकानदारा समोर फोडली त्यामध्ये सुध्दा अळ्या निघाल्या त्यावर दुकानदार म्हणाले आमचा यामध्ये काही दोष नाही.तुम्ही जिल्हा पुरवठादार डिलरशी बोला त्यांना माहिती दिल्यावर ते वेळेवर आले नाही. तरी उशीरा आल्यानंतर संबंधित झालेला प्रकार नगर येथील पुरवठा करणाऱ्या डिलरला सांगिल्यावर त्याने असे होणार नाही सांगितले पण गावातील अनेकांनी सत्य परिस्थिती सांगितली तेव्हा संबंधित डिलरने तुम्हांला कोणाकडे जायचे त्याच्याकडे आमचे कोणी वाकडे करु शकत नाही. आमच्या कंपनीचा ब्रॕड मोठा आहे.आम्हांला अशा किरकोळ विषयाने काही फरक पडत नाही.असे म्हणून गावातून निघून गेला .
झालेला सर्व प्रकार ग्राहक पियुश कटारिया यांनी बातमीदारांना सांगितला व घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ व फोटो दाखविले. सत्य परिस्थिती पाहिल्यावर खरी घटना समजली परंतु डेरीमिल्क कंपनीचे व्यवस्थापक जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करित आहेत.याची अन्न व भेसळ विभागाने दखल घेऊन सदर दुकानदार व पुरवठादार यांच्यावर पोलिस कार्यवाही करुण असे प्रकार पुन्हा होणार नाही याची दखल घेऊन ग्राहकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबविला पाहिजे अन्यथा यातून उन्हाळ्याच्या दिवसात कोणाला विषबाधा झाली तर जबाबदार कोण राहिल म्हणून कंपनीवर कडक कारवाई करावी अशी मागणी कटारिया यांनी केली आहे.