धक्कादायक ! बायकोला सासरी पाठवत नसल्याने केला सासूचा खून

नाशिक – पती विनाकारण मारहाण करतो म्हणून माहेरी निघून गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या पतीने पत्नी व सासूवर विळ्याने हल्ला केल्याने सासू कमळाबाई सोमा भुतांबरे (४५) या जागीच गतप्राण झाल्या.
तर पत्नी इंदुबाई किसन पारधी व १२ वर्षीय मुलगी माधुरी या दोघी जखमी झाल्या, पतीला दारूचे व्यसन असल्याने इंदुबाई माधुरीला घेऊन माहेरी झारवडला आली होती. रविवारी तिचा पती किसन पारधी आला व त्याने पत्नीला घरी येण्याबाबत आग्रह केला.
त्यावरून पती-पत्नीत भांडण झाले. किसनने विळ्याने पत्नी इंदुबाई हिला मारहाण केली. सासू कमळाबाई व मुलगी माधुरी भांडण सोडविण्यास गेल्या. किसन याने कमळाबाई यांच्या पोटात व पाठीवर कात्रीने वार केले.