धक्कादायक: चारित्र्याच्या संशयावरून मुलीसमोरच पतीने केली पत्नीची हत्या

प्रतिनिधी DNA मराठी टीम
पुणे – सात वर्षीय मुलीसमोर पतीने (Husband) पत्नीची (Wife) चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना चाकणमध्ये घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याच्या शोध घेत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ही हत्या पत्नीच्या चारित्र्यावर (character) संशय घेत करण्यात आली. आज पहाटेच्या सुमारास पत्नी गाढ झोपेत असताना तिच्या गळ्यावर वार करून त्यांने तिचा खून केला. सचिन काळेल असे आरोपीचे नाव आहे. (Shocking: Husband kills wife in front of girl on suspicion of character)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणमध्ये काळेल कुटुंब राहात होतं. आरोपी सचिन हा एका कंपनीत कामाला होता. तर, पत्नी अश्विनी दोन दिवसांपासून कामाला जात होती. परंतु, सचिन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. आज पहाटेच्या सुमारास सचिनने गाढ झोपेत असलेल्या पत्नीचा सुरुवातीला गळा आवळून आणि मग चाकूने वार करून खून केला.
धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार सात वर्षीय मुलीसमोर घडल्याचं चाकण पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, आरोपी सचिन हा फरार झाला आहे. मुलीने शेजारी राहणाऱ्या तिच्या काकाला ही बाब सांगितली. त्यानंतर चाकण पोलीस ठाणे गाठून याबाबत माहिती देण्यात आली. या प्रकरणी सचिनचा चाकण पोलीस शोध घेत आहेत.(Shocking: Husband kills wife in front of girl on suspicion of character)