धक्कादायक ! तुरुंगवास भोगून आल्यानंतर पतीने केली पत्नीची हत्या

राजूर – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना राजुरी येथे घडलेली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पती जगन्नाथ भागा आडे याला अटक केली आहे.जगन्नाथ यापूर्वी दहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगून बाहेर आला होता. आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आपल्या कुटुंबासह शेलविहिरे या ठिकाणी राहत होता. आरोपीला नेहमीच तिची पत्नी रंजनाच्या चारित्र्याविषयी संशय असायचा यावरूनच तिने यापूर्वी रंजनावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यात त्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली होती.
आरोपी शिक्षा भोगून 2011 मध्ये तुरुंगातून बाहेर आला. त्यानंतर त्याने पुन्हा रंजनाशी संसार थाटला. दरम्यान, 19 मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आरोपीने पुन्हा पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिच्या डोक्यात खोरे आणि टिकावाच्या दांडय़ाने मारहाण करून तिचा खून केला. यानंतर तो पसार झाला होता.
तेव्हापासून राजूर पोलीस हे त्याच्या शोधात होते. तपासात मिळालेल्या तांत्रिक माहितीवरून जगन्नाथ भागा आडे हा रांजणगाव (ता. शिरूर, जि. पुणे) येथे वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागिय पोलीस अधिकाऱयांच्या पथकाने रांजणगाव येथे शोध घेऊन आरोपीला अटक केली. याप्रकरणी त्याचा मुलगा जालिंदर आडे याने फिर्याद दिली आहे.